थोर माकणी येथील मारुती देवस्थानास अ तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवून देणार – दिलीपराव देशमुख

थोर माकणी येथील मारुती देवस्थानास अ तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवून देणार - दिलीपराव देशमुख

सपत्नीक दर्शन घेऊन मारुतीला केला महाभिषेक

लातूर (प्रतिनिधी) : माकणी थोर येथील श्री मारुती महाराज देवस्थान भाविकांचे श्रध्दास्थान असून या ठिकाणीं राज्यातील व शेजारील कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येतात त्यांना राहण्यासाठी भक्त निवास उपलब्ध करून देण्यात आले आहे भविष्यात इथे मंदिराला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवून देणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी येथे बोलताना सांगितले ते शनीवारी निलंगा तालुक्यातील थोर माकणी येथील जागृत देवस्थान असलेल्या मारुती चे सपत्नीक सौ सूवर्णाताई देशमुख यांनी दर्षन घेतले त्यानंतर येथे नियोजित होत असलेल्या अन्नछत्र महाप्रसाद भवन १ एकर मध्ये होत असून या अन्नछत्र भवनाचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख सौ सुवर्णा दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते शनिवारी १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

थोर माकणी येथील मारुती देवस्थानास अ तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवून देणार - दिलीपराव देशमुख

तत्पूर्वी मारुती महाराज मंदिरात दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली तसेच यावेळी मारुती मंदिर संस्थानच्या वतीने यावेळी शाल श्रीफळ व मारुतीची प्रतिमा देवुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सौ सुवर्णा दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, सौ वनमाला आबासाहेब पाटील, जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे,मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे उपाध्यक्ष शामराव भोसले, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय साळुंके, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ अजित माने, माजी सभापती मधुकरराव पाटील, दयानंद चोपणे, पंकज शेळके दत्ता शाहीर सतीश पाटील, सुधाकर पाटील, मारुती मंदिराचे अध्यक्ष मगर सूर्यवंशी, उपाध्यक्ष लक्ष्मण बामणे, कोशाध्यक्ष परमेश्वर सूर्यवंशी, सचिव हणमंत सूर्यवंशी, सहसचिव चंदर सूर्यवंशी, विश्वस्त विनायक सूर्यवंशी, शिवराम सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, प्रकाश बिराजदार, बाबू कोकरे, मधुकर जाधव, रामराव माकनिकर, बालाजी सूर्यवंशी, वामन यादव, रघुनाथ सूर्यवंशी यांच्यासह गावातील भक्त गण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author