माने परिवाराचे माजी आ.कव्हेकरांकडून सांत्वन

माने परिवाराचे माजी आ.कव्हेकरांकडून सांत्वन

लातूर (प्रतिनिधी) : येथील माने टायर्सचे मालक अरूण बाबूराव माने यांच्यासह पत्नी गिता अरूण माने, मुलगा मुकुंदराव अरूण माने या तिघांचे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामर्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळस नं.2 च्या हद्दित झालेल्या भिषण अपघातात नुकतेच निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या लक्ष्मी कॉलनी येथील निवासस्थानी भेट देवून माने कुटुंबियाचे सांत्वन केले. यावेळी त्यांचे जेष्ठ बंधू महेंद्र माने, लहान बंधू सचिन माने, चुलत बंधू दिलीप माने यांच्यासह शहरातील संजय बोरा, किर्ती भूतडा, सोलापूर मनपाचे माजी कमिशनर अजय सावरीकर, सतीश पाटील हे उपस्थित होते.

यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जननायक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!