स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथे माता पालक मेळावा

स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथे माता पालक मेळावा

लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम लातूरद्वारा संचलित स्वामी विवेकानंद कव्हा येथील शाळेत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा माता पालक मेळावा व ओपन डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ.अरूणा कांदे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कव्हा गावच्या नुतन सरपंच पद्मीन सोदले, देशमुख सर, कदम, मानकरी, धामनगावे, मोकाशे, थंबा, आक्‍कलदिवे, मस्के, घार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या सराव परिक्षेचे पेपर उपस्थित पालकांना दाखविण्यात आले. त्यांना अभ्यास करातना येणार्‍या अडचणी तसेच पालकांच्या अडचणीही यावेळी जाणून घेण्यात आल्या. याबरोबरच इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी वार्षीक परिक्षेला सामोरे जाताना परिक्षेची कशी तयारी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला माता-पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!