जागृती शुगर च्या ५,२१,०११ साखर पोत्याचे गौरवी भोसले यांच्या हस्ते पूजन संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीज च्या वतीने चालु गळीप हंगामात १३ फेब्रुवारी अखेर ३ लाख १ हजार ५८० मेट्रिक टनाचे उसाचे गाळप करण्यात आले त्यात उत्पादीत केलेल्या ५ लाख २१ हजार ११ साखर पोत्याचे (५० किलो नग) पूजन रविवारी तळेगाव येथील साखर कारखान्यावर जागृती शुगर च्या चेअरमन सौ.गौरवी अतुलजी भोसले (देशमुख) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, चिप इंजिनियर दरेकर, चिप केमिस्ट येवले, चिप अकोंटंट वाकडे, शेतकी अधिकारि आर के कदम, संगणक समन्वयक नागरगोजे आदी कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याच्या चेअरमन गौरवी अतुलजी भोसले (देशमुख)यांनी चालू गळीत हंगामाची व विविध योजना साखर कारखाना च्या माध्यमातून शेतकरी ऊस उत्पादक यांच्यासाठी राबवत आहेत त्याची सविस्तर माहिती संबंधित अधिकारी यांच्याकडून घेतली.