नेत्ररोग शिबिरात 536 रुग्णांची तपासणी, 170 रुग्णांना मोतीबिंदू
राघवेंद्र सुपर शॉपी व उदयगिरी लायन्स क्लब उदगीर चा उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 535 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली यात 170 लोकांना मोतीबिंदू आढळून आल्याने त्यांना उदयगिरि लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर याठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी पाठवण्यात आले.
अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख विद्यालयात राघवेंद्र सुपर शॉपी व लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी उदयगिरि लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अहमदपूरचे आरोग्य अधिकारी दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लातूरचे लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी चे प्रोजेक्ट चेअरमन राजेश मित्तल, व्यंकटेश फडके, ॲड संग्राम आप्पा परमा, मुख्याध्यापिका कुलकर्णी पर्यवेक्षिका जोगदंड, डॉ गणेश जोगदंड, डॉ विष्णू पवार, राघवेंद्र सुपर शॉपी च्या संचालिका रत्नप्रभा गादेवार, राहुल गादेवार, राघवेंद्र गादेवार, आदींची उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य अधिकारी डाॅ.दत्तात्रय बिराजदार म्हणाले की अनेकाकडे धन वैभव असते परंतु समाजकार्यासाठी दातृत्व मात्र नसते राघवेंद्र सुपर शॉपी ने व्यवसायाबरोबर मानवतेच्या जाणिवेने नेत्र शिबीर आयोजित करून दृष्टी दानाच्या उदात्त कार्यात स्वताला प्रज्वलित करून इतरांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याचं काम केले आहे.हे कार्य निश्चितच स्तुत्य आहे. प्रत्येकाने आपल्या व्यवसायातील नोकरीतील दोन टक्के हिस्सा आपण समाजकार्यासाठी वापरला पाहिजे दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच खरी परमेश्वराची सेवा आहे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. आभार राघवेंद्र गादीवर यांनी मानले. सोशल डिस्टन्स ठेवून व सर्वांना मास्क वाटप करून कोरोनाच्या नियमाचे पालन करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी साईनाथ गादेवार, संतोष कोटलवार, प्रसाद गादेवार, बालाजी गादेवार,भारत सांगवीकर यांनी परिश्रम घेतले.