भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त श्यामलाल हायस्कूलमध्ये ध्वजारोहण संपन्न !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त श्यामलाल हायस्कूलमध्ये ध्वजारोहण संपन्न !
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त श्यामलाल हायस्कूलमध्ये ध्वजारोहण संपन्न !

उदगीर : श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ मोतीपवळे यांच्या हस्ते संपन्न झाला. ध्वजारोहणासाठी प्रमुख अतिथीस पाचारण N. C. C. प्रमुख सोनाळे बालाजी यांनी केले.
ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमासाठी संस्था मान्यवर अभंगराव कोयले, शिरसे सुर्यकांत, शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण,प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये, प्रवीण भोळे, प्रा. सपाटे ज्ञानेश्वर,भरत खंदारे व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीत सुनील बागडे यांनी सादर केले. कु. कस्तुरे शिवलीला, वळवी दिधिती, खरटमोल मनस्वी, या विद्यार्थिनींनी त्याग, देशभक्ती याद्वारे देशाचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचे पुनरुज्जीवन व्हावे असे मनोगत व्यक्त केले तसेच सहशिक्षक सूर्यवंशी उमाकांत यांनीही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मनोगत व्यक्त केले आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे त्या निमित्ताने आपल्या देशाने काय प्रगती केली यासंबंधी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले. आभार व्यक्त करण्याचे कार्य गीर भगवान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय देबडवार,दिनेश बोळेगावे, स्वामी बस्वराज, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author