जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती रुजवावी – डॉ राजकुमार मस्के

जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती रुजवावी - डॉ राजकुमार मस्के

उदगीर : वाचाल तर वाचाल .वाचन ही काळाची गरज आहे. वाचनातून जीवनाला योग्य दिशा मिळते.
जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती महत्वाची असते असे प्रतिपादन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी वाचन व्यक्तिमत्व, विकास व राष्ट्रप्रेम या विषयावर आयोजित कार्यक्रम प्रसंगी काढले. येथील शिवाजी महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव व डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती व वाचन प्रेरणा अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ मस्के बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती ,ग्रंथालय विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव हे होते तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ रामकिशन मांजरे, उपप्राचार्य डॉ. एस व्ही जगताप यांची होती.
पुढे बोलताना मस्के म्हणाले वाचन हा आपल्या सवयीचा भाग बनवला पाहिजे. नित्यनेमाने वाचन केले पाहिजे असेही ते म्हणाले तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले प्रत्येक व्यक्तीला अगदी लहान वयापासून वाचनाची गोडी निर्माण झाली पाहिजे .त्यासाठी प्रत्येकाच्या घरातील कपाट पुस्तकांनी भरलेले असावे. तरच वाचन संस्कृती चांगली रुजेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार यांनी तर आभार डॉ. सुरेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा डॉ के डब्ल्यू गुट्टे, डॉ एस डी सावंत, डॉ. व्ही के भालेराव, डॉ. एच. आर. तिरपुडे, डॉ नदाफ एम एफ, डॉ. एम एन शेख, सहायक ग्रंथपाल आर.एन. आडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author