कौशल्याधारित आणि बहुविद्याशाखीय शिक्षण काळाची गरज – कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

कौशल्याधारित आणि बहुविद्याशाखीय शिक्षण काळाची गरज - कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यास प्रमुखआतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने होते. मंचावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी व ॲड.प्रकाश तोंडारे, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, सदस्य मन्मथ बिरादार, ललिता पाटील, डॉ.श्रीकांत मध्वरे, माजी आ. शिवराज तोंडचिरकर, गंगाधर दापकेकर ,डॉ.एन.आर.दुबे, डॉ.सुधीर जगताप, उषा कांबळे, प्रा.सुभाष बडीहवेली, माजी प्राचार्य डॉ.एम.व्ही.उमाटळे, डॉ.आर.आर.तांबोळी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनायक जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य सी.एम.भद्रे यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ.भोसले यांचा महाविद्यालय, संस्था व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.भोसले म्हणाले माजी विद्यार्थी मेळावा हा महाविद्यालयाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, ज्ञान आणि योगदानाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे, बदलत्या काळात कौशल्याधारित व बहु विद्याशाखाशिक्षण घेणे गरजेचे आहे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय विद्यापीठ कार्यक्षेत्रात लौकिक पात्र आहे, महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष मानकरी म्हणाले दर्जेदार शिक्षणाशिवाय पर्याय नाही, संस्था महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. अंबरखाने म्हणाले उदगीर परिसराला आकार देण्यात या महाविद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे भाषा प्रयोगशाळा सुरू करण्याबद्दल प्रयत्न केले जातील. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.के.आर.गव्हाणे यांनी करून दिला, सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम.बी.स्वामी यांनी केले तर आभार डॉ.आर.के.मस्के यांनी मानले.

About The Author