श्यामार्य कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झेंडावंदन उत्साहात साजरा

श्यामार्य कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झेंडावंदन उत्साहात साजरा

श्यामार्य कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झेंडावंदन उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी उपस्थित होते. श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते, पर्यवेक्षक नाना चोपडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे पाचारण श्रीहरी निडवंचे यांनी केले. देशभक्तीपर गीत विजय बैले आणि विद्यार्थ्यांच्या समूहाने घेण्यात आले.
तिरंगा’ आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो.आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतरगत अंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा देते.लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहेअसे ज्येष्ठ पत्रकार बी एस कुलकर्णी यांनी आपले मत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वनकुद्रे तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते यांनी मानले.

About The Author