मातृभूमी महाविद्यालयाने तिरंगा रॅलीतून केली जनजागृती, तिनशे विद्यार्थ्यांना ध्वज प्रदान
तिरंगा हातात घेत ,तिनशे विद्यार्थ्यांची साखळी , उदगीरकरांचे वेधले लक्ष
उदगीर : आझादी का अमृत महोत्सव आंतर्गत मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली ,ध्वज प्रदान कार्यक्रम व तिरंगा विद्यार्थ्यांची साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी ,तहसिलदार रामेश्वर गोरे पोलिस निरिक्षक गोरख दिवे, सहायक पोलीस निरिक्षक भिमराव गायकवाड, मातभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे ,प्राचार्या उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
स्वतंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मातृभूमी महाविद्यालय ,कस्तूराबाई नर्सिंग स्कूल ,मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या वतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी तिरंगा रॅली ,तसेच मातृभूमी महाविद्यालय व नायब तहसिलदार संतोष धाराशिवकर यांनी दिलेल्या तिरंगा ध्वजाचे वितरण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातृभूमीच्या वतीने तिरंगा रॅलिचे आयोजन करण्यात आले होते .मातृभूमी महाविद्यालया पासुन निघालेली रॅली छञपती शिवाजी महाराज चौक , डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून जात पुन्हा मातृभूमीत समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा बिभीषण मद्देवाड , केले सुञसंचलन प्रा रुपाली कुलकर्णी यांनी आभार ,प्रा रणजित मोरे , यांनी केले . यावेळ प्रा उस्ताद सय्यद ,प्रा रुपाली कुलकर्णी , प्रा रेखा रणक्षेञे , नंदकिशोर बयास ,संतोष जोशी ,जगदिशा ओमकारे ,अन्वेश हिप्पळगावकर , आंबादास पोतदार, ,आदिनी प्रयत्न केले .
तिनशे विद्यार्थ्यांनी साखळीतून “घरोघरी तिरंगा” विषयी केली जनजागृती
मातभूमीच्या तिनशे विद्यार्थ्यांनी हातात ध्वज घेत मानवी साखळी करत स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत घरोघरी तिरंगा या विषयी शासकिय दवाखान्याकडे जाणारा रस्ता ते नगर परिषदेच्या जवळील महाराष्ट्र बँकेपर्यंत हातात तिरंगा ध्वज घेत साखळी केली होती . विद्यार्थ्यांनी केलेल्या तिरंगा साखळीने उदगीरकरांचे लक्ष वेधले होते.