वैजापूरे परिवाराच्या वतीने शेकडो तरुणांना उद्योगाला लावले – प्रा सिद्धेश्वर पटणे

वैजापूरे परिवाराच्या वतीने शेकडो तरुणांना उद्योगाला लावले - प्रा सिद्धेश्वर पटणे
वैजापूरे परिवाराच्या वतीने शेकडो तरुणांना उद्योगाला लावले - प्रा सिद्धेश्वर पटणे

उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर येथील सुप्रसिद्ध युवा उद्योजक, महात्मा गांधी बँकेचे अध्यक्ष, एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे चेतन वैजापूरे यांनी आणि त्यांचे पिताश्री चंद्रकांत अण्णा वैजापूरे यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेकडो तरुणांना उद्योग धंदा उभा करण्यासाठी अर्थ सहाय्य केले .असे विचार इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सिद्धेश्वरजि पटणे यांनी व्यक्त केले.
ते चेतन वैजापूर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून तरुण विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय प्रेम जागृत व्हावे म्हणून तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रमात संयोजक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत चेतन वैजापूरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदर अण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेस चे संचालक प्रा. प्रदीप वीरकपाळे, अंकुश आठाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी केले.
एका सामाजिक विचारधारा घेऊन चालणाऱ्या युवा नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हरघर तिरंगा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना तिरंगा वाटप करण्यात आल्याचे, याप्रसंगी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय जामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत काटवटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author