जिल्हा काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा शानदार शुभारंभ
लातूर तालुक्यातील काटगाव, टाकळी, जेवळी, नागझरी येथील पदयात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतीसाद
लातूर (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व स्वातंत्र प्राप्ती नंतर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू ते डॉ मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने दिलेले योगदान जडणघडणीत मोलाचा वाटा राहिलेला आहे हे वास्तव्य चित्र जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हयात ९ ते १३ ऑगस्ट पर्यंत आझादी गौरव पायी पदयात्रा काढण्यात आली असून शनिवार रोजी लातूर तालुक्यात या गौरव पायी पदयात्रा शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुक्यातील काटगाव, टाकळी, नागझरी, जेवळी येथे मोठया प्रमाणावर ग्रामस्थांनी उपस्थित राहुन यात सहभाग नोंदविला आहे.
देशात व राज्यातील लातूर जिल्ह्याच्या जडणघडणीत काँग्रेस नेत्यांचा मोठा वाटा
तालुक्यातील टाकळी काटगाव, टाकळी, नागझरी, जेवळी येथे गावातून निघालेल्या पदयात्रेत ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला अनेक ठिकाणीं महिलांनी अक्षवन केले शाळेतील मुल सहभागी झाले होते लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांचा हा लातूर तालुका विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत असलेला तालुका असल्याने आज पायी चालत पदयात्रेत तब्बल ५०० ते ६०० काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गौरव पदयात्रेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, पदयात्रा समन्वयक प्रवीण पाटील, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, काँग्रेसच्या विविध फ्रंट चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, एकनाथ पाटील, हरीराम कुलकर्णी, शरद देशमुख प्रवीण सुर्यवशी, सिरजोद्दिन जहागीरदार, सुरेश चव्हाण, रमेश सूर्यवंशी, विपुल हाके, रामराजे काळे, प्रा सुधीर पोतदार, विठल पांचाळ, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटिल, मुन्ना उपाडे, गवळी, रमेश थोरमोटे, ज्ञानेश्वर भिसे, अमोल भिसे, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा दैवशाला राजमाने, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील, गोविन्द बोराडे पदाधिकारी उपस्थित होते
संवाद बैठका पायी पदयात्रेत काँग्रेसचा नारा
यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पदयात्रेत भारतमाता की जय काँग्रेस जिंदाबाद, इंदिरा गांधी, राजीवजी गांधी जिंदाबाद लोकनेते विलासराव देशमुख साहेब माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख साहेब यांचा विजय असो राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय आशा घोषणा देत ग्रामीण भागातील गावात नारा देत घोषणा दिल्याने लोकांत काँगेस बद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण झालेला दिसत असल्याचे चित्र बघायला मिळाले.