भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने लातूर पंचायत समितीच्यावतीने आज कविसंमेलन
लातूर (प्रतिनिधी) : लातूर पंचायत समितीच्या वतीने,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रविवार,दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४ वाजता पंचायत समिती सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कविसंमेलनाचे उद्घाटन लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते होणार आहे, अध्यक्षपदी प्रख्यात कवी-गझलकार संजय घाडगे हे राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून कवी योगीराज माने, रमेश चिल्ले आणि रमेश विवेकी हे उपस्थित राहणार आहेत. सदरील कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी भारत सातपुते हे करणार आहेत.
या कवी संंमेलनात उर्मिला भालके, सुरेश गीर, प्रा.डॉ.क्रांती मोरे, डॉ.मीना घुले, दयानंद बिराजदार, गोविंद जाधव,प्रा.दुष्यंत कटारे, प्रा.दर्शना देशमुख, शैलजा कारंडे, राजेंद्र माळी, विमल मुदाळे, मंदाकिनी गंभीरे, नयन राजमाने, वृषाली पाटील,वीरभद्र हिरेमठ, जना घुले, विश्वांभर इंगोले, वंदना केंद्रे, नुरजहॉं सय्यद, अजहर शेख, विजया भणगे, ऍड.रजनी गिरवलकर, संजय जमदाडे, उषा भोसले हेकवी सहभागी होवून काव्य सादर करणार आहेत. या कविसंमेलनाचा काव्यप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर पंचायत समितीच्यावतीने करण्यात आले आहे.