सामूहिक राष्ट्रगान उदगीरात उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर प्रतिनिधी : उदगीर शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, नगरपरिषदेसमोरील बसवेश्वर चौकातील प्रांगणात मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सकाळी ठीक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगान गायले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सामूहिक राष्ट्रगान घेतले.
याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, विविध शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर यांच्यासह विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी वीरभद्र(भोला) गुळागडे, महारुद्र गालट, विशाल गुडसुरकर, भांडार विभागाचे संदीप कानमंदे, नगर अभियंता अल्लाउद्दीन काझी, स्वच्छता विभागाचे ज्ञानेश्वर काळे, संकीर्ण विभागाचे वैजनाथ बदनाळे ,अग्निशामक विभागाचे विशाल आलटे, विद्युत विभागाचे उदय लीपिली, लेखा विभागाचे निलेश यशवंतकर, हुतात्मा स्मारक ग्रंथालयाचे ग्रंथपाल ज्ञानेश्वर पारसेवार यांच्यासह नगरपरिषद प्रशासनातील विविध विभाग प्रमुख आणि विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच नगरपरिषद व्यापारी संकुलातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.