ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसाह्य द्या – आ.संजय बनसोडे
विधी मंडळाच्या पायर्यावरच आंदोलन सुरू !
उदगीर (एल. पी. उगिले) : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बळीराजाला संकटात टाकणाऱ्या पावसाने हाहा: कार माजवला आहे. ज्या हलक्या शेतजमिनी आहेत, त्या ठिकाणी गोगलगाय सारखे उपद्रवी कीटक वाढल्याने,मोझाक सारखे विषाणु वाढल्यामुळे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीन नामशेष झाले आहे.
तर कांहीं ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जी काळी जमीन आहे, त्या जमिनीत पाणी साचून पिके पिवळी पडली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी एकाकी पडला आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने नैतिक जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे. शासनाने महसुल विभागाकडून पंचनामे करण्याचे नाट्य करू नये.सरसकट सर्व शेतकर्यांचे नुकसान झाले आहे,याची जान आणि भान ठेऊन संपूर्ण राज्यभर ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी आग्रही मागणी माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी विधानसभा अधिवेशन चालू असतांना विधीमंडळाच्या पायर्यावर आंदोलन करून सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. शेतकरी हतबल झाला आहे,खचला आहे. आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अगोदरच कर्जाचा डोंगर त्याच्या अंगावर असल्याने, शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाने अडचणीत आला आहे. अशा प्रसंगी शासनाने त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
राजकारणासाठी राजकारण हे जरूर करा, परंतु हे करत असताना जी शासनाची अत्यावश्यक कामे आहेत, त्या कामांना प्राधान्य द्या. अशी ही मागणी याप्रसंगी आ. संजय बनसोडे यांनी लावून धरली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याला ई डी ची नोटीस झाली आहे का? अटक होणार का? वगैरे प्रश्न प्रसिद्धी माध्यमांनी विचारले असता, त्या सर्व अफवा असून ही सर्व चौकशी यापूर्वी केव्हाच झाली आहे. आणि क्लीन चिटही मिळालेली आहे. असे ही स्पष्टीकरण याप्रसंगी संजय बनसोडे यांनी केले.
इतर प्रश्नाकडे लक्ष विचलित करून प्रमुख गरज आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज बळीराजाला मदतीची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. ही मागणी आ. संजय बनसोडे यांनी सतत लावून धरली. सभागृहात गदारोळ चालू असताना देखील, आ. संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या अर्थसाह्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कायम लावून धरली होती,या प्रश्नावर आ.संजय बनसोडे आंदोलनाच्या दरम्यान खुपच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. यातून शेतकऱ्याबद्दलचा त्यांचा कळवळा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, ही भावना,ही त्यांची तळमळ स्पष्ट होते. अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे.