शिक्षणमहर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार

शिक्षणमहर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार

रक्तदान शिबीरात 111 बँग रक्त संकलन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शिक्षणरत्न, दलितमित्र,
शिक्षणमहर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त अहमदपूर तालुक्यातील कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या महसुल विभाग,पोलिस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,नगरपालिकेतील कर्मचारी,शिक्षण विभागातील कर्मचारी यांचा कोरोना योध्दां म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूर व संयोजन समितीच्या वतीने वतीने गौरव करण्यात आला तसेच यावेळी 111 बॅगचे रक्त संकलन झाले.

याबाबत अधिक वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार व रक्तदान शिबिरात उदघाटक म्हणून आ.बाबासाहेब पाटील हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे उपस्थित होते. तर यावेळी मा. राज्य मंत्री बाळासाहेब जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय बिराजदार, डॉ.सुनीता ताई चवळे, डॉ.भालचंद्र पैके, पो.उ.नि. डक साहेब, सुधाकर फुले, दुय्यम निबंधक शशिकांत डहाळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी संयोजन समितीच्या वतीने लोहारे गुरुजी याःचा वाढदिवसानिमित्य सत्कार करण्यात आला.
यावेळी कोविड योध्दां म्हणून उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रेय बिराजदार,डॉ.अमृत चिवडे,कला शिक्षक महादेव खळुरे,सुनिता पारधे,प्रवीण पाटील,सुनंदा मतलाकुटे, जनाबाई महाळंकर,विजयकुमार पाटील,रमेश आलापुरे,सोपान दहिफळे,दत्तात्रेय मद्दे,सुनील कांबळे,विशाल ससाने,दिपक वाडीवाले,राणी गायकवाड,शेख जिलानीआदि कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीरात 111 बँग रक्त संकलन करण्यात आले. यावेळी सत्कार संयोजन समिती अहमदपूर व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा अहमदपूर संघाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, मुख्याध्यापक , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विश्वंभर स्वामी यांनी तर सूत्रसंचालन कपिल बिरादार,राजकुमार पाटील यांनी केले. उपस्तिथांचे आभार प्रा.बालाजी कारामुंगीकर यांनी मानले.

About The Author