धानोरा ( बु) येथील जि प शाळेच्या बाला उपक्रमाला निधी कमी पडू देणार नाही
नवनिर्वाचित ग्रामपंचायत संरपच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार सोहळा.
किनगांव ( गोविंद काळे ) : राजकारणातून समाजसेवा करणार माझे गांव असून गांवाच्या विकासात राजकारण करणार नाही सेवा सुविधा देताना माझ्या गांवच्या जि प प्रा शाळेच्या बाला उपक्रमाला निधी कमी पडू देणार नाही असे मत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा ( बु ) आयोजीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी गुरूवार दि११ फेब्रु२०२१ रोजी सरपंच सौ सुवर्णा रतिकांत कोलपुसे, उपसरपंच अमोल बालासाहेब जाधव, यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नयुमभैय्या शेख होत तर
प्रमुख पाहुणे पं.स.सदस्य कमलाकर पाटील, लातूर जि प चे स्वीकृत सदस्य नंदकुमार कोनाले , केंद्रप्रमुख इस्माईल शेख , कोपरा गावचे उपसरपंच तथा सामाजिक नेते प्रा.बालाजी आचार्य, केंद्रीय मुख्याध्यापक अशोकराव शिंदे , गटसाधन व्यक्ती ज्ञानोबा सुकरे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गोपीनाथ जोंधळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुंदरराव साखरे, पोलीस पाटील सुर्यकांत कोलपुसे , भाजपा अल्पसंख्याक सेल चे जिल्हाध्यक्ष याकूब शेख, , चेअरमन जयवंतराव जाधव, सरपंचपती रतिकांत कोलपुसे, युवा नेते नितीन शिंदे,भारत शिदे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्रीनिवास जाधव, माजी सदस्य पंढरी आदटराव हणमंत आदटराव, पाणलोट क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष धनंजय साखरे, आदि होते तर प्रमुख उपस्थीती मुख्याध्यापक उमाकांत भिकाणे ,माजी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, दयानंद शिंदे, श्री गुणवंत करळे, उपाध्यक्ष परमेश्वर सोमवंशी,पालक कृष्णा जाधव, सौदागर करळे, नरसिंग देशमुख, ब्रम्हानंद आदटराव, नामदेव कोलपुसे माजी सैनिक भालेराव आदि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या
सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते छञपती शिवाजी महाराज ,राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना उपसरपंच अमोल जाधव म्हणाले की, बाला उपक्रमांक्रमासाठी चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी कमी पडला तर लोकवाटा जमा करून सहकार्य करू असे आश्वासन शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत भिकाणे यांना दिले यानंतर केंद्रप्रमुख शेख, साधनव्यक्ती सुकरे नंदकुमार कोनाळे , यांनी बाला उपक्रक्रमाचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त करताना
गावकऱ्यांना लोकवाट्यासाठी प्रेरित केले.त्याचे फलित म्हणून गावकऱ्यांनी लागलीच लोकवाटा देण्यास सुरुवात केली यात उपसरपंच अमोल बालासाहेब जाधव यानी 11,000/- ग्रा प सदस्य निळकंठ बापूराव पाटील 7000/- माजी सरपंच गोपीनाथ जोंधळे 5000/ अशोक शिंदे 5000/- प्रा.बालाजी आचार्य
असे एकूण नगदी रोख रुपाने 29000/- अक्षरी एकोणतीस हजार रुपये व्यासपीठावरचं लोकवाटा मिळाले मुख्याध्यापक भिकाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला सत्कार मुर्ती सरपंचसौ.सुवर्णा रतिकांत कोलपुसे, उपसरपंच अमोल बालासाहेब जाधव- सर्वश्री ग्रा प सदस्यश्री निळकंठ बापूराव पाटील,हरीशचंद्र विश्वनाथ वडमिले.सौ.फातेमाबी ईस्माईल शेख सौ.सुनिता ज्ञानोबा साखरे,सौ. दुर्गा सुभाष खलसे,सौ.प्रितम जिवन शिंदे सौ.मिना सिद्धार्थ सुर्यवंशी,प्रसन्नजीत पांडुरंग जोंधळे,सौ.सुमन वैजनाथ पगडले यांचा सत्कार सोहळा मान्यवराच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी प्रा बालाजी आचार्य मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिक्षकांनी केलेला सत्कार बहुमोलाचा असून यातून नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच सदस्यांनी प्रेरणा घेऊन शाळेच्या उपक्रमासाठी भरभरून मदत करावी शाळा ही आपली असून स्वच्छ आणि सुंदर बनवून आनंद आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे आणि भविष्यात शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकिल, इंजिनिअर घडावेत शिक्षकही आनंदी राहावेत यासाठी शिक्षकांवर आर्थिक भार टाकण्यात येऊ नये असे ही आवाहन उपस्थीत सर्वाना केले यावेळी प स सदस्य कमलाकर पाटिल मनोगत मांडताना पंचायत समितीचा माझा निधी उपलब्ध करून देतो आणि लोकवाटा म्हणून अकरा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर अध्यक्षीय समारोप नयुम शेख यांनी केला या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सहशिक्षक बाबुराव शेळके यांनी केले तर सुत्रसंचलन सहशिक्षक राहूल गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षीका पुष्पा जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नयुम शेख ,शाळेचे मुख्याध्यापक श्री उमाकांत भिकाणे, सहशिक्षक रामराव सोनेवाड, उपक्रमशील सहशिक्षक नवनाथ आचार्य, पदवीधर सहशिक्षीका सुकेशनी डोंगरे , सहशिक्षाका वसुंधरा चव्हाण आदिनी परीश्नम घेतले राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांना व मान्यवरांना स्वादिष्ट भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता झाली.