तीन पिढ्यांतील योगशिक्षकांनी दिले योग प्रशिक्षण

तीन पिढ्यांतील योगशिक्षकांनी दिले योग प्रशिक्षण

अहमदपूर( गोविंद काळे ) : संस्कृती उद्यान,अहमदपूर येथे नुकतेच अकरा दिवसांचे निःशुल्क योग शिबीर पार पडले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात योगशिक्षकांच्या तीन पिढ्यांनी मार्गदर्शन केले. पन्नास वर्षांपासून योग शिकवणारे आदरणीय योगाचार्य शिवमूर्ती भाताम्ब्रे; सौ कलावती भाताम्ब्रे; सौ प्रेमा वतनी; योग संरक्षक माजी तहसीलदार श्री ओमप्रसाद सोनी; सौ उषा गोजमे; श्री प्रमोद वालेवाडीकर कुलकर्णी; आजच्या पिढीतील योगरत्न डाॕ मेजर मधुसूदन चेरेकर; कवी अभियंता प्रा.अनिल चवळे, सौ वृषाली चवळे, सौ पुष्पा ठाकूर, सौ मनीषा व श्री केशव मुंडकर, श्री. गौरव चवंडा; श्री.माधव वाघमारे, सौ दयावती हिंगरुपे; श्री सचिन कोंडलवाडे; श्री सागर व सौ अंजली कुलकर्णी; श्री.जगदीश जाधव; सौ विशाखा तांदळे, सौ कौशल्या पवार तर उगवत्या पिढीतील आंतरराष्ट्रीय योगभूषण सुषमा येणगे; कुमारी स्नेहा मुंडकर; श्री विशाल डुब्बेवार व चि.शुभम ठाकूर या योगशिक्षकांनी या शिबिरात अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले.शिबिरास नगरीतील १००पुरुष आणि १२५ महिलांची उपस्थिती होती. शिबिराचे सुंदर आयोजन श्री.अभय मिरकले, श्री. अझहर बागवान; श्री.चंद्रशेखर भालेराव; श्री. ज्ञानोबा भोसले; श्री ज्योतिर्लिंग शिंदे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री प्रदीप फुलसे व श्री लिम्बाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना श्री. मेघराज गायकवाड, चि. संदीप गायकवाड, अॕड. स्वप्ना नळेगांवकर, सौ संगीता मिरकले, सौ.पूजा गायकवाड, श्री मारोती बुद्रुक पाटील, श्री रत्नाकर नळेगांवकर यांनी साह्य केले. शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे लाडके आमदार श्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवानंद तात्या हेंगणे, रा काँ चे तालुकाध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख, श्री मोहिब कादरी हेही उपस्थित होते. समारोपास तहसीलदार प्रसाद कुलकर्णी , डाॕ मनकर्णा व अमृत चिवडे,डाॕ वर्षा भोसले हे उपस्थित होते. डाॕ सुनील चलवदे यांनीही शिबिरात उपस्थिती नोंदवली. शिबिरात स्वामी रामदेव यांचे नऊ प्राणायाम, श्री श्री रविशंकर व रत्नमोहन यांचे सूर्यनमस्कार, श्रुतिकांत ठाकूर यांचे सूक्ष्म व्यायाम, भातांब्रे सरांनी शोधलेले नवीन प्राणायाम पतंजली, आर्ट आॕफ लिविंग, स्वामी विवेकानंद योग संस्थान, यांच्या परंपरेतील यौगिक प्रकार शिकवण्यात आले. जलनेती, सूत्रनेती, चक्षु प्रक्षालन, कपालभाती, अग्निसार, त्राटकया क्रियांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ८४हून अधिक विभिन्न योगासने, प्राणायाम व क्रिया शिकवण्यात आल्या.

About The Author