अहमदपूर तालुक्यातून केंद्रेवाडी ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाला

अहमदपूर तालुक्यातून केंद्रेवाडी ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाला

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव 2022 उपक्रमात सहभाग घेऊन सौ अयोध्याताई अशोकराव केंद्रे व जि प सदस्य अशोक काका केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या केंद्रेवाडी ग्रामपंचायतने अहमदपूर तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच अहमदपूर पंचायत समिती विस्तार अधिकारी पट्टेवाड साहेब यांचे मार्गदर्शनही लाभले यात सुंदर माझे कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन जसे, वृक्ष लागवड, स्वतंत्र विषयीची जनजागृती अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून उपक्रम राबवल्यामुळे केंद्रेवाडी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक मिळाला यासाठी सरपंच सौ. ज्योती माधव केंद्रे, उपसरपंच सौ. ज्योती बालाजी केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य सौ. इंद्रायणीबाई भानदास केंद्रे ,सौ. पुष्पा प्रकाश केंद्रे, भानुदास रंगनाथ केंद्रे, ज्ञानोबा भास्कर केंद्रे, तुकाराम मनोहर केंद्रे, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मोहन श्रीपती केंद्रे, ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे या सर्व टीमचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!