जिल्हा परिषद लातुर कडुन मुख्याध्यापक संतोष पिट्टलवाड यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणुन सन्मानीत

जिल्हा परिषद लातुर कडुन मुख्याध्यापक संतोष पिट्टलवाड यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणुन सन्मानीत

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त स्वराज्य उपक्रमांतर्गत लातुर जिल्हा परिषद व औसा पंचायत समितीकडुन मागिल वर्षभरात विवीध उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रमांतर्ग जिल्हा परिषद शाळा जमालपुर येथे मुख्याध्यापक संतोष पिट्टलवाड यांच्या पुढाकाराने अनेक उल्लेखनिय उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये मुख्याध्यापक म्हणुन संतोष पिट्टलवाड यांचे कार्य औसा तालुक्यात उल्लेखनीय आसे राहीलेले आहे. या सर्व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन लातुर जिल्हा परिषदेने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे औसा तालुक्यातून आजादि का अमृत महोत्सवात व बाला उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्क़ृष्ट मुख्याध्यापक म्हणुन शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मँडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

मुख्यकार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, उप मुख्यकार्यकारी अधिकारी गिरी, जनसंपर्क माहीती व प्रसिद्धी अधिकारी पाटील, वित्त व लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ज्यांनी ज्यांनी आपली जबाबदारी पार पाडली याही पुढे जाऊन जबाबदारी पेक्षाही पुढे मन लावून अनेकांनी काम केलं. त्यांनी तालुक्यात सर्व विभागात उल्लेखनीय काम केलं त्यांची त्याही पातळीवर ग्रामपातळीवर म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर ज्या ग्रामपंचायतीने अत्यंत उल्लेखनीय काम केलं त्या एका विशिष्ट भागामध्ये त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आला.ज्या शाळेनी सगळ्यांबरोबर काम केलं पण आपला ठसा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम करुन उमटवला आशा शाळेच्या लातुर जिल्ह्यातुन 10 तालुक्यातुन फक्त 10 मुख्याध्यापकांचा सन्मान जिल्हापरिषदेने केला. त्यात जिल्हा परिषद जमालपुर हि एकमेव द्विशिक्षकी शाळेचा समावेश आहे.

गेल्या दिड दोन वर्षात मुख्याध्यापक संतोष पिट्टलवाड यांनी बाला उपक्रमासाठी गावातील सरपंच व काही निवडक ग्रामस्थांची टिम तयार करुन कोरोना सारख्या कठिण प्रसंगी गावात फिरुन 1,40,500 रुपयांचा रोख लोकवाट व 20000 रुपयांचा वस्तु स्वरुपात लोक वाटा त्यांनी जमा केला. कोरोना मध्ये लोकांच्या हाताला काम नसताना लोकांकडे पैसा खेळता नसताना देखील छोट्याशा गावातुन ईतकी मोठी रक्कम जमवण्याचे मोठे काम संतोष पिट्टलवाड यांनी केले. त्या पैशाचा योग्य तो विनियोग करुन बाला उपक्रमात अतिशय सुंदर काम केले. बाला उपक्रमातील 28 च्या 28 घटक शाळेने तयार केले आसुन तालुकास्तरीय मुल्यांकनात औसा तालुक्यात 100 पैकि 100 गुण घेणारी शाळा म्हणुन जमालपुर शाळेची निवड झाली.

याशिवाय शाळेने आजादि का अमृत महोत्सवा अंतर्गत स्वराज्य कार्यक्रमात विवीध उपक्रम राबविलेले आहेत. औसा तालुक्यातील विवीध शैक्षणिक उपक्रमात भाग घेतला आसुन चांगल्या प्रकारचे काम त्यांनी केलेले आहे. संतोष पिट्टलवाड सरांचा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणुन सनम्मान केल्यामुळे औसा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी मँडम, विस्ताराधिकारी राम कापसे साहेब, सेलु केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ बोयणे साहेब, जमालपुर गावाचे सरपंच गंगाधर साळुंके, बालाजी सोनटक्के, अदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!