महात्मा फुले महाविद्यालयात स्वराज्य सप्ताह निमित्त समूह राष्ट्रगीत गायन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘स्वराज्य सप्ताह ‘ समारोपानिमित्त समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत तिरंगा ध्वज रॅली, तिरंगा ध्वजाचे वाटप, १४ ऑगस्ट रोजी देशविभाजन विभिषिका स्मृतीदिना निमित्त उपप्राचार्य दुर्गादास चौधरी यांचे भाषण ठेवण्यात आले. तसेच, १५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
या बरोबरच दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान महाविद्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. या सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर यावेळी उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, क्रीडा संचालक प्रो. डॉ.अभिजीत मोरे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर तसेच प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रशांत बिरादार, प्रा. अतिश आकडे, डॉ.पी. पी. चौकटे, डॉ. डी. एन. माने, डॉ.सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील प्रा. डी. जे. चव्हाण, प्रा. गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
