दयानंद कला महाविद्यालयात संत सेवालाल यांची जयंती उत्साहात साजरी

दयानंद कला महाविद्यालयात संत सेवालाल यांची जयंती उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत सेवालाल यांची जयंती दयानंद कला महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री परमेश्वर हसबे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे होते तर अभाविप लातूर विभाग संघटन मंत्री सिद्धेश्वर तिडके यांची विशेष उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी परमेश्वर हसबे म्हणाले की,” संत सेवालाल हे बंजारा समाजाचे पाहिले नेते होते. त्यांनी बंजारा समाजाला संघटित करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्व युवकांनी घ्यावी.

 याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ शिवाजी जवळगेकर, डॉ रमेश पारवे, डॉ अंजली जोशी, डॉ प्रशांत मान्नीकर, डॉ संतोष पाटील, डॉ बालाजी घुटे,डॉ रामेश्वर खंदारे, डॉ प्रदीप सूर्यवंशी, अधिसभा सदस्य डॉ संदीपान जगदाळे व नवनाथ भालेराव आदी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

About The Author

error: Content is protected !!