जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई; 6 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहर तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे चोरून नेऊन हैदराबाद येथे स्वस्तात विक्री करायची आणि पैसे कमवायचे, असा धंदा करणाऱ्या काही लोकांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उदगीर नव्हे तर लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे रात्री चोरुन न्यायचे आणि शेतकऱ्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मध्यस्थी करून त्या शेतकऱ्याला त्याच्या मालकीचेच जनावरे अर्ध्या किमतीवर विकायचे! असा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रा लगत असलेल्या कर्नाटक सेनेतील हुल्लाळ भागात काही चोरट्यांची शैली होती!

 मात्र  मध्यंतरीच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवंश हत्या बंदीला विरोध केला. त्यासाठी स्वतंत्र कायदा बनवला, आणि या कायद्याच्या अनुषंगाने जबर शिक्षा ही तरतूद केली. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही चोरटे गोवंश किंवा इतर जनावरांची चोरी करून हैदराबाद बाजारात मटन विक्रीसाठी ही जनावरे विकू लागली. कित्येक वेळा बेवारस असलेली जनावरे, रस्त्यावर मोकाटपणे फिरणारी जनावरे हे तर या चोरट्यांनी फस्त केलीच केली, त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गाई-म्हशी चोरून चोरट्या बाजारात विक्रीचेही काम सुरू केले.

 उदगीर तालुक्यातील शेकापुर येथील बाबुराव नामदेव शेल्हाळे यांनी अत्यंत कष्टाने गाई म्हशी पालन करून दूध डेरी चा धंदा चालवला होता. शेतीला पूरक धंदा म्हणून दुधाच्या धंद्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र चोरट्यांनी यांच्या मराठवाडा पातळीवरील पशु प्रदर्शनात प्रथम आलेल्या गाईचसह इतरही चार गाई आणि म्हशी चोरून नेल्या. यासंदर्भात बाबुराव नामदेव शेल्हाळे यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात रितसर फिर्याद दिली होती. या फिर्यादी सोबतच इतरही अनेकांनी या दरम्यानच्या काळात जनावरे चोरी झाल्याची फिर्याद दिल्याने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तपासकामी लावले.

 या पथकात सपोनी घारगे, पल्लेवाड आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस नाईक नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, माधव केंद्रे, घोडके, तुळशीराम बरूरे, राहुल गायकवाड, नाना शिंदे यांना नियुक्त करून या गुन्हे प्रगटीकरण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या.

 वरिष्ठांच्या सूचनेनुसार या तपास पथकाने योग्य तो तपास करून आरोपीतांना हैदराबाद( तेलंगणा राज्यातून) चतुर्भुज केले. यामध्ये आरोपी किशोर सखाराम कांबळे, शरदकुमार नंदकुमार श्रीडोळे रा. बनशेळकी रो,ड उदगीर, सुलेमान सलीम सय्यद रा. किल्ला गल्ली उदगीर, सद्दाम गुल रशीद कुरेशी रा. हळी तालुका उदगीर, पाशा शेख राहणार गल्ली पेठ मंडल नरसिंगी हैदराबाद, तेलंगणा राज्य यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केले. गुरांची चोरी गेलेल्या जनावरांच्या बाबतीत विचारपूस करून त्यांच्याकडून सहा लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय जनावर चोरी टोळीकडून उदगीर परिसरातील नव्हे तर लातूर आणि सीमावर्ती भागातील अनेक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पशू प्रदर्शनात प्रथम आलेल्या गाई, वळू यांची चोरी करून दुष्ट भावनेने हैदराबाद येथे विक्री करून आपला स्वार्थ साधण्यासाठी शेतकऱ्याचे दैवत असलेल्या आणि उपजीविकेचे साधन असलेल्या जनावरांना  मटणासाठी कत्तल केली गेल्याचेही यासंदर्भात बोलले जात आहे. अधिक तपासाअंती काही जनावरे जिवंत असून ती जनावरे लवकरच संबंधितांच्या हवाली केले जातील, अशी खात्री या गुन्हे प्रकटीकरण विभागातील प्रमुख असलेले पोलिस नायक नामदेव सारोळे, चंदू कलमे यांनी बोलून दाखवले आहे. ग्रामीण पोलिसांनी अल्पावधीत मोठी धाडसी कारवाई करून आंतर राज्य पातळीवर चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांची टोळी अटक केल्याबद्दल ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author