ग्रीन लातूर वृक्ष चा, ग्रीन व्हॅलेंटाईन डे

ग्रीन लातूर वृक्ष चा, ग्रीन व्हॅलेंटाईन डे

झाडे लावून साजरा केला ‘ग्रीन व्हॅलेंटाईन डे’

लातूर (प्रतिनिधी) : ‘हॅलेंटाईन डे’ व ह्र्दय याचे संबंध सर्वश्रुत आहे. शहराचे ह्रदय म्हणजे झाडे, आणि शहरात झाडे नसतील तर शहराचे आरोग्य बिघडणारच. म्हणुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावेळेसचा ‘व्हॅलेंटाईन डे’ ‘ग्रीन ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणुन साजरा करण्याचे ग्रीन लातूर वृक्ष टीमने ठरवले.

झाडे लावणे व झाडे जगवून पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून लातूरच्या ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बाभळगाव रोडवरील शिक्षक कॉलनी येथे ३२ मोठी झाडे लावली. झाडांना टॅकरद्वारे पाणी दिले. झाडांना फुगे बांधून झाडांवर प्रेम करावे, झाडांसोबत जगावे, निसर्गाचे आरोग्य जपा, झाडांना पाणि द्या, शहराचे आरोग्य जपा असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

वाढत्या प्रदुषणामुळे, घातक रसायनांचा दैनंदिन जीवनात वाढत चाललेला वापर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होउन माणसांचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे कोरोनाच्या रुपाने समोर आले आहे. निसर्गाचे आरोग्य टिकविणे, मानवाचे आरोग्य टिकविणे याकरीता पर्यावरण रक्षण करणे महत्वाचे आहे. आणि झाडांची संख्या वाढल्याशिवाय पर्यावरण सुधार होणार नाही याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी या ‘व्हॅलेंटाईन डे’ पासून पुढील ‘व्हॅलेंटाईन डे’ पर्यंत दररोज १० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली यादव-लोंढे, बालाजी शिंदे, लक्ष्मण केंद्रे, कल्पना फरकांडे, रुषीकेश दरेकर, शिवशंकर सुफलकर, सिताराम कंजे, सुलेखा कारेपुरकर, आशा अयचित, श्रुती लोंढे, सिया लड्डा, गोविंद शिंदे, सुहास पाटील, सुरज पाटील, महेश भोकरे, कृष्णा वंजारे, विजयकुमार कठारे, मुकेश लाटे, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठान, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, प्रमोद वरपे, दयाराम सुडे, ख्वाजाखां पठाण, बालाजी उमरदंड, मंगेश शिंदे, विक्रांत भुमकर, आदित्य लोंढे, अभिजीत चिल्लरगे, शिक्षक कॉलनीचे राजाभाउ गवळी, कल्याणकर, सिरसाट, घटकर, मोहन कठारे, चामले, ज्योतीबा माने, देशमुख सर इत्यादी सर्वांनी वृक्ष लागवडीकरीता खड्डे खोदणे, झाडे आणणे, काळी माती आणणे, झाडे लावणे, पाणी देणे याकरीता श्रमदान केले.

यावेळी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने व शिक्षक कॉलनीच्या नागरीकांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!