सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनेच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनेच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

जिल्हयात 120 गावात होणार जनजागृती; निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या हस्ते शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,लातूरच्या वतीने जिल्हयात चित्ररथ व एलईडी व्हॅनव्दारे 120 गावात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या हस्ते हरी झेंडी दाखवून करण्यात आला.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात या आयोजित कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.पडदुणे, विभागीय माहिती कार्यालयाचे लेखापाल अशोक माळगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे लिपिक दिलीप वाठोरे उपस्थित होते.

जिल्हयात चित्ररथ व्दारे 80 तर एलईडी व्हॅनव्दारे 40 अशा एकूण 120 गावांत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृतीचा कार्यक्रम तालुकानिहाय पूढील प्रमाणे आहे. चित्ररथ लातूर :-रामेश्वर, भातांगळी, आर्वी, गंगापूर, हरंगूळ (बु.), बोपला, जवळा (बु) एकुरगा, निवळी. औसा :-कारला,बोरगाव (बु.) उटी (बु) दावतपूर,तावशी ताड, लिंबाळा दाऊ, गुबाळ, उजनी,माळकोंडजी, टाका, मातोळा, लामजना, आशिव,किल्लारी बेलकुंङ निलंगा :-अन्सारवाडा,गौर,हंद्राळ,ताडमुगळी, औरादशहाजानी,अंबुलगा (बु)निटूर, पानचिंचोली,कासारशिरसी. शिरुर अनंतपाळ :- साकोळ, धामनगाव, लक्कडजवळगा, अंकुलगा, दैठणा, भिंगोली, डिगोळ उदगीर :-वायगाव,करडखेड,तोंडार,चांदेगाव,चिमाची वाडी, हंडरगुळी.
चाकूर:- म्हाळंगी, घरणी, नळेगाव, वडवळ नायगाव, कबनसांगवी, नोगशवाडी, अहमदपूर:-कोपरा, टाकळगांव (का) सावरगाव रोकडा, हडोळती, शिरुरताजबंद, किनगाव.रेणापूर :-सांगवी,पानगाव,खरोळा, कोरेपूर,पोहरेगाव,कोष्टगांव, देवणी :-वलांडी, इस्माईलवाडी,जवळगा,डोंगरवाडी,संगम,विलेगाव,सावरगाव,अचवला व जळकोट:- जळकोट, अतनुर,वंजारवाडा,गुट्टी,घोणसी, धामनगाव,रावणकोला,पाटोदा या गावचा समावेश आहे.
LED व्हॅन :- लातूर :-रामेश्वर,करकट्टा,जेवळी, गुंफावाडी, औसा:- कारला, मासुर्डी, सिंदाळावाडी, नागरसोगा, निलंगा :-अन्सरवाडा,सरवडी,डांगेवाडी, टाकळी, शिरुरु अनंतपाळ:- साकोळ, टेंभूर्णी, सोरा, कानेगाव, उदगीर :- वायगाव, लोणी, डोंगरशेळकी, भाकसखेडा, चाकूर:- म्हाळंगी, राचन्नावाडी, जगळपूर (खु) उजळंब, अहमदपूर:-कोपरा, टेंभूर्णी,सोरा, चिलखा, रेणापूर:-सांगवी, मोरवड, फावडेवाडी, पाथरवाडी, देवणी :- वलांडी, सिंधीकामठ, लासोना, भोपणी व जळकोट:- येलदरा, मरसांगवी, मेवापूर, शेलदरा या गावांचा समावेश आहे.
लातूर जिल्हयातील नागरिकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून चित्ररथ व एलईडी च्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन या योजनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी लातूर यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!