लातूर जिल्हा वार्षिक योजनेसाठी 255 कोटी मंजूर

लातूर जिल्हा वार्षिक योजनेसाठी 255 कोटी मंजूर

2022-23 पासून उत्कृष्ट जिल्ह्यांना प्रत्येक महसूली विभागात ‘चॅलेंज फंड’ म्हणून 50 कोटीचा अतिरिक्त निधी

औरंगाबाद/लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021 -22 च्या लातूर जिल्ह्याच्या प्रारुप आराखड्याला मान्यतेसाठी अजित पवार, उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 15 फेब्रुवारी, 2021 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीस मंत्री वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर अमित देशमूख, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), राज्यमंत्री संजय बनसोडे, रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन व संसदीय कार्य लोकसभा सदस्य ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, उस्मानाबाद, या बरोबरच सर्वश्री आमदार विक्रम काळे, संभाजी पाटील निलंगेकर, धीरज देशमुख, अभिमन्यू पवार, अप्पर मुख्य सचिव (नियोजन विभाग) देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर, औरंगाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनवकुमार गोयल, लातूर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, व लातूर जिल्हयातील कार्यान्वयीत यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी लातूर यांनी मागील 5 वर्षातील मंजूर नियतव्यय व खर्चाची माहिती सादर केली. यामध्ये चालू आर्थिक वर्षासाठी रुपये 24000,00 लक्ष नियतव्यंय मंजूर असून सन 2021-22 साठी कार्यान्वयीत यंत्रणाची रु. 30300,00 लक्ष ची अतिरिक्त मागणी करण्यात आलेले आहे. यामध्ये अंगणवाडी बांधकाम, लघुपाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, नगर विकास, पोलीस व तुरुंग विभाग, जनसुविधा, कौशल्य विकास, उर्जा विभाग, पशुसंवर्धन इत्यादी विभागासाठी जास्तीच्या निधीची मागणी करण्यात आली. मात्र अत्यावश्यक योजनेसाठीची मागणी रु. 12500,00 लक्ष ची आहे. हा निधी देण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयात 32 निजामकालीन शाळा, अंगणवाडयांसाठी इमारती, तसेच आरोग्य विभागाच्या इमारती आणि पोलीस स्टेशनचे नवीन बांधकाम इत्यादी काम आवश्यक आहेत. यासाठी मागणी विषयी बैठकीत सादरीकरण केले.

आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत कामांचे अंतर्गत रोजगारासाठी, प्रत्येक गावातील पाणीपूरवठयासाठी वेगळा निधी देण्यात यावा. तसेच प्रत्येक गावातील पानंद रस्ते व शेत रस्त्यासाठी चे निधी देण्यात यावेत. तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेले रस्ते व पूल बांधकामाची निधी देण्याची मागणी केली.

आमदार धीरज देशमख यांनी, मराठवाडयातील अवर्षण प्रवण तालुक्यात सौर उर्जाची निर्मित प्रायोगिक तत्वावर करण्याची मागणी केली. त्याच प्रमाणे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले की, अपूर्ण असणाऱ्या आरोग्य इमारतीसाठी प्राधान्याने निधी देण्यात यावा. अतिवृष्टीने नुकसान झालेले रस्ते व पूल बांधकामासाठी निधी मागणी केली.

उजनी ते धनेगाव ही योजना आवश्यक असून लातूरसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सदर योजना मंजूर करावी, असे विभागीय आयुक्त यांनी बैठकीत सांगितले. यावर सर्वच लोकप्रतिनिधीनी लातूरसाठी दुसरा जल स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामूळे सदर योजना प्राधान्याने मंजूर करावी. यावर उपमुख्यमंत्री महोदयांनी सदरचा प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले. बैठकीत जिल्हयाचे पालकमंत्री अंतिम देशमुख यांनी, कोरोना संकटामुळे राज्याचा महसूल कमी झालेला आहे. तरी उपमुख्यमंत्री जेवढा निधी वाढविता येईल तितका निधी लातूर जिल्ह्यासाठी वाढवून द्यावा, असे निवेदनही केले.
यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी हा आरोग्य योजनांसाठीच खर्च करण्यात यावा. सन 2020-23 पासून प्रत्येक महसूली विभागात ‘चॅलेंच फंड’ म्हणून रु. 50.00 कोटी अतिरिक्त निधी एका जिल्ह्याला दिला जाईल. यासाठी वेळेत प्रशासकीय मान्यता देणे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी नियमित आयोजित करणे. आय-पॉस प्रणालीचा वापर करणे इत्यादी निकष आहेत. आय-पॉस प्रणालीचे लॉग इन सर्व संबंधितांना उपलब्ध करून देयावे. तसेच कोरोनासंकटामुळे राज्याचा कमी झालेला महसूल, केंद्राकडून जीएसटीचा निधी वेळेवर मिळाला नसल्याने निधी वाढवून द्यायला मर्यादा येतात. जास्तीत जास्त निधी वाढवून दिला जाईल तसेच राज्याच्या आर्थिक नियोजनातून काही विभागांना निधी दिला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यंमत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!