राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील आदर्श लातूर जिल्हा निर्माण करू – दिलीपराव देशमुख

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील आदर्श लातूर जिल्हा निर्माण करू - दिलीपराव देशमुख

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लातूर जिल्हा बँकेची भूमिका

सोयाबीन,सौरऊर्जा, सोलार पंप प्रकल्पाला बॅक कर्ज देणार

लातूर जिल्हा बॅंकेची ३७ वी सर्वसाधारण सभा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रात लातूर जिल्हा प्रगतीशील आदर्श जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगून लातूर जिल्हा बँकेने काही धोरणात्मक निर्णय घेतले असुन या निर्णयात सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्रात लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक होते.त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प व सोलार पंप प्रकल्पासाठी बॅक पतपुरवठा करणारं आहे.बागायती बरोबर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्यासाठी धोरण ठरवित असून सर्वांना नेहमीच मदत करण्याची भूमिका लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेली आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

पुढें बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात लातूर जिल्हा बॅंकेने वेगवेगळे निर्णय घेवुन न्याय मिळवून देण्यासाठी सभासद शेतकरी याना आर्थिकदृ्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला असून ३ लाख रुपये कर्ज शून्य टक्के दराने, तुती लागवड साठी शून्य टक्के दराने दोन लाख रुपये कर्ज देण्याचा धाडसी निर्णय घेतला त्यात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला दिसतं आहेत त्यात बॅंकेच्या आर्थिक विकासाकडे लक्ष वेधून जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या चेहर्यावर हास्य हे आमचे यश आहे असे सांगून येणाऱ्या काळात पक्ष, जात, धर्म , यांच्या पलीकडे जावून सर्वांना मदत करण्याची भूमिका जिल्हा बॅंकेची राहिलेली आहे पुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हीं काम करणारं आहोत राज्यात लातूर पॅटर्न राज्यभर नाव झाल आहे त्यात आदर्श लातूर जिल्हा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न क रू या असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.

यावेळी सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे , रेणा साखर कारखान्यांचे चेअरमन सर्जेराव मोरे , विलास साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन रवींद्र काळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन अँड काकडे यांनी मागच्या पंचवार्षिक संचालक मंडळ यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेने प्रगती केली असून ठेवी, नफ्यात वाढ केली आहे तसेच सामान्य माणसाला जिल्हा बँक आपली आहे असे कार्य करीत सभासद ग्राहकास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे संगणक सिस्टीम मध्ये जावून वेगवेगळे निर्णय घेवुन विकासभिमुख कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे त्यानी यावेळी बोलताना सांगितले.

विकासात्मक धोरण घेणारी लातूर जिल्हा बँक

राज्यात अनेक जिल्हा बॅंका अडगळीत पडलेल्या असताना लातूर बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे काम करीत आहे त्यांचे श्रेय नेते दिलीपराव देशमुख साहेब यांना जाते असे सांगून सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम जिल्हा बँकेने केले आर्थिक विकास याच बँकेमुळे झालेला असून ग्रामीण भागातील शेतकरी समृध्द झालेला दिसत आहे असे आमदार बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेने प्रगती करत बँक राज्यात अव्वल स्थानावर असून यामुळे सर्वांना नेहमीच मदत करणारी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेने अनेक निर्णय घेतले आहेत त्यामुळे आर्थिक क्रांती घडवून आली असे ते म्हणाले.

सभेचे वाचन बॅंकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले यावेळी व्यासपीठावर रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, जिल्हा बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख, अँड प्रमोद जाधव संभाजी सुळ, भगवानराव पाटील विजयनगरकर, सुधाकर रुकमे, व्यंकट बिरादार, ए न आर पाटील, धर्मपाल देवशेटे, सौ शिवकन्या पिंपळे सौ स्वयंप्रभा पाटील, यशवंतराव चव्हाण, संजय बोरा, नाबार्ड चे रायवाड, अशोक गोविंदपुरकर, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, सुग्रीव लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. सचिन सूर्यवंशी यांनी केले.

चौकट

जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचा अभिनंदनाचा ठराव

बँकेतील कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाची दखल घेऊन लवकरच न्याय देणार

सर्वसाधारण सभा kovid १९ चे नियम पाळून सुरक्षीत अंतर राखून पार पडली

विविध विषयाला एक मताने ठरावा ला सभासदांनी टाळ्या वाजवून मंजुरी दिली

अतिशय सुरेख नियोजन को विड१९ मुळे मास्क वापर करून सभेस सभासदाची उपस्तीती होती

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!