लहान बालकांसाठी बुधवारी मोफत सुवर्णप्राशन शिबिर

लहान बालकांसाठी बुधवारी मोफत सुवर्णप्राशन शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे जन्मापासून ते 16 वर्ष वयोगटाच्या लहान बालकांमध्ये शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा त्वचेची कांती वाढविण्यासाठी आजादी का अमृतमहोत्सव या संकल्पनेनुसार हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य अभियान अंतर्गत मोफत सुवर्णप्राशन(बाल रसायन घृतपान)-एक आयुर्वेदिक लसीकरण हे शिबिर पुष्य नक्षत्र दिवस बुधवार, दिनांक:-24-08-2022 रोजी सकाळी ठीक 10.30am ते दुपारी 04.30pm या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशन केल्यामुळे बालकांच्या शरीरात इम्युन सेल्स व टी-सेल्स वाढतात,रोगप्रतिकारक्षमता वाढते,शरीरामध्ये कसलेही मेटाबाॅलिक बदल न होता त्याचा लहान मुलांच्या पोषणामध्ये लाभ होतो असे सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.

तरी या मोफत सुवर्णप्राशन शिबिराचा पालकांनी त्यांच्या लहान बालकांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन प्राचार्य तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय वि.पाटील,रुग्णालय समिती प्रमुख प्रा.डॉ.मंगेश मुंढे,N.A.B.H.समिती प्रमुख प्रा.डॉ.राजेंद्र धाटे,रुग्णालय समिती सहप्रमुख प्रा.डॉ.रविकांत पाटील,N.A.B.H.समिती सहप्रमुख प्रा.डॉ.रश्मी चिद्रे,सुवर्णप्राशन शिबिर समन्वयक तथा बालरोग विभागप्रमुख प्रा.डाॅ.अस्मिता भद्रे,रुग्णालय उपाधिक्षक तथा समन्वयक डॉ.उषा काळे,प्रा.डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.अवतारसिंग मिस्त्री आणि सर्व डॉक्टर्स-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!