वासवीमाता व महिलासभे तर्फे मखर वाटप
उदगीर (प्रतिनिधी) : वासवी माता महिला मंडळ उदगीर व महिला महासभा उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने वासवी मातेच्या चरणी चांदीचे मखर अर्पण सोहळा व श्रावण सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय महिला महासभेच्या अध्यक्षा सौ. माधुरी ताई कोले, महाराष्ट्र महिला महासभेच्या अध्यक्षा सौ सुलभाताई वट्टमवार, लातूर जिल्हा महिला महासभेच्या अध्यक्षा सौ अंजलीताई कोटलवार उपस्थित होत्या.
तसेच वासवी माता महिला मंडळ उदगीर च्या अध्यक्षा सौ सुजाताताई पंदीलवार, कोषाध्यक्ष सौ दीप्ती मलगे उपस्थित होत्या. प्रथम वासवी मातेचे पूजन दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. वासवी माता महिला मंडळ कडून मायाताई बच्चेवार यांचा मुलगा व्यंकटेश बच्चेवार या विद्यार्थ्यास शिक्षणासाठी 25 हजार रुपयाची मदत करण्यात आली.
तसेच आयोपा कडून सुचवण्यात आलेल्या समाज बांधवांच्या गृहनिर्मितीसाठी आठ हजार रुपयाची मदत करण्यात आली. वासवी मातेच्या मकरासाठी चांदी अर्पण करणाऱ्या सर्व महिलांचा पीस, औटी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्रावण सोहळ्यानिमित्त सुंदर नृत्य सादर करण्यात आले. कुचीपुडी श्रावण महिन्यातील मंगळागौर अशी विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आली.
उदगीर मधील बहुसंख्य महिलांनी आणि बालिकांनी यात सहभाग घेतला होता. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, आणि यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती देबडवार व सौ स्वाती पांपट्टीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. शुभांगी वट्टमवार ,मनिषा पारसेवार ,राधिका वट्टमवार, विनीता मरेवार, स्मिता मुक्कावार, सुहासिनी सुरशेटवार ,श्रद्धा महाजन, ज्योती चिद्रेवार, सुप्रिया महाजन यांनी अथक परिश्रम घेतले.
