शिवाजी महाविद्यालयात तंबाखू मुक्त शपथ ग्रहण
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालययात सकाळी 11 वाजता तंबाखू, जर्दा, धूम्रपान चे दुष्परिणाम बाबत महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ देण्यात आली.ही शपथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही ए जाधव यांचा मार्गदर्शनाखाली क्रीड़ा संचालक प्रा. नेहाल अहमद खान यांनी सर्व प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना दिली .या वेळी उपप्राचार्य डॉ एस व्ही जगताप, उपप्राचार्य प्रा. डॉ आर एम मांजरे यांची उपस्थिति होती.
क्रीडा संचालक प्रा नेहाल अहमद खान यांनी सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करण्यासाठी मार्गदर्शन केले . सर्वांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन आयुष्यभरात लागू देणार नाही, प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राह्न्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, व्यसनमुक्ती साठी असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करीन ,अमली पदार्थ विरोधी आयुष्यभर जागृती करण्याचा संकल्प करीन अशी शपथ घेतली.
