कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा

कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय येथे स्व . राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या 31 डिंसेबर 2021 च्या परिपत्रकातील सुचने नुसार सद्भावना दिवस साजरा करण्यात आला.यावेळी प्रतिज्ञा वाचन मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषेत करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन हिंदी विभागाच्या वतीने प्रा.डॉ. शिवहार साळुंके व प्रा.डॉ. बालाजी महाळंकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकत्तेर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!