कौशल्य विकास व उद्योग केंद्राचे उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल उदगीर व सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयाच्या वतीने कायमस्वरूपी तळागाळातील महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून महिलांना शिवणकाम मोफत प्रशिक्षण कौशल्य विकास व उद्योग केंद्राचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या पत्नी कल्पना मेंगशेट्टी, उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या पत्नी संपदा गोरे ,श्रीमती विमल गर्जे यांच्या शुभहस्ते महिला शिवण प्रशिक्षण केंद्र उद्घाटन करण्यात आले. विमल गर्जे यांनी शिवणकाम प्रशिक्षण केंद्रास पाच नवीन शिलाई मशीन भेट दिल्याबद्दल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, विनोद पेंढारकर मुंबई,भगवानराव वट्टमवार,रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चे अध्यक्ष रो.रामेश्वर निटूरे,सचिव रो. व्यंकटराव कणसे, प्रोजेक्ट चेअरमन रो. मंगला विश्वनाथे, रो .महानंदा सोनटक्के, रो.रमेश अण्णा अंबरखाने,डॉ. अंबादास शेकापुरकर,उमाकांत बुधे, रो.विजयकुमार पारसेवार,रो.सुधीर जाधव,रो.किशोर पंदीलवार,रो.संतोष फुलारी,रो. अन्नपूर्णा मुस्तादार, अशोक नाईक उमरगा,उल्हास आंबेगावकर, प्रितेश घटन मुंबई, विवेक प्रभू मुंबई, कमलेश पटेल, धर्मेंद्र श्रीमाल, सुनील जैन धाकड यांच्यासह रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चे अनेक पदाधिकारी, सदस्य शाळेतील शिक्षक, शिवणकाम प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
