नगरपालिका आपल्या दारी

उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवाने साजरा होत आहे. तसेच पुढील वर्षी म्हणजे 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 75 वर्ष होत असल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे पुढील वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या ऐतिहासिक घटनेचे महत्व लक्षात घेता उदगीर शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये सकारात्मक बदल होणे अपेक्षित आहे.
त्याअनुषंगाने नगर परिषद उदगीर कार्यालयातील सर्व कर्मचारी हे शहरामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना कचरा विलगिकरण करणे व प्लास्टिक चा वापर न करणे बाबत जनजागृती करत आहेत. यासाठी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मुख्याधिकारी यांच्या समवेत सर्व कार्यालयीन कर्मचारी नागरिकांना जनजागृती करीता शहरामधील विविध भागामध्ये जात आहेत. तसेच उदगीर शहरातील नागरिकांना उदगीर नगरीचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार याच्या कडून आवाहन करण्यात येते की, कचरा विलगीकृत द्यावा. जेणेकरून त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावता येईल.

ओला कचरा दैनंदिन घेण्यात येईल. तसेच आठवड्यामध्ये सात दिवस विविध सात प्रकारचा सुका कचरा देण्यात यावा. जसे की, सोमवार-कागद व कापड, मंगळवार- प्लास्टिक काच केस, बुधवार-थर्मोकोल पुठ्ठा फोम, गुरुवार-धातू रबर टायर, शुक्रवार- ई- वेस्ट, शनिवार-प्लास्टिक, रविवार-उर्वरित कचऱ्यातील घटक जो उपरोक्त यादीमध्ये नमूद नाही याप्रमाणे नगर परिषद कडून गोळा करण्यात येईल. जेणेकरून कचऱ्यावर प्रक्रिया योग्यरीत्या करण्यात येईल. तसेच नागरिकांनी प्लास्टिक च्या वापरावर स्वत:हुन बंदी घालावी,जेणेकरून पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर यांच्यातर्फे करण्यात येते.

About The Author

error: Content is protected !!