समाजात नवीन संकल्पना रुजवणारी पोस्ते पोद्दार लर्निंग स्कूल

समाजात नवीन संकल्पना रुजवणारी पोस्ते पोद्दार लर्निंग स्कूल

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील नवीन नवीन संकल्पना प्रत्यक्षात राबवून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सूप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी उपक्रम राबवणारी शाळा म्हणून पोस्ते पोद्दार लर्निंग स्कूल ओळखली जाते.
या शाळेतील कलाशिक्षक जहांगीर पटेल यांनी इको फ्रेंडली गणपती ही पर्यावरण पूरक कृती असल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील शाडू माती पासून गणपती बनवण्याची कला शिकउन या कलेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण केली, आणि समाजामध्ये पर्यावरण पूरक मूर्तीचीच जास्तीत जास्त पूजा केली जावी. असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेली गणपती मूर्ती न वापरता शाडू माती पासून बनवलेल्या मूर्ती वापराव्यात. असा संदेश या शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजात रुजवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक देखील करून दाखवले, अशाच पद्धतीची कृतीशीलता आणि सुरजनशीलता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, म्हणून वेगवेगळे उपक्रम प्रत्यक्ष राबवली जात आहेत. अशी माहिती जहांगीर पटेल यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!