बामणी येथे हनुमंत देवराई अंतर्गत पाच हजार वृक्ष लागवडीचा आज शुभारंभ
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील बामणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील दोन हेक्टर जमिनीवर मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करून एक नवीन पॅटर्न निर्माण करण्यासाठी हनुमंत देवराई निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. प्रभावती राजकुमार बिराजदार यांनी दिली आहे.
या उपक्रमाची सुरुवात माजी राज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयजी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे, सहयोग अर्बन बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने, सहकार महर्षी तथा लिंगायत वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंदरअण्णा वैजापूरे, माजी आ. गोविंदअण्णा केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका लक्ष्मीबाई भोसले, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव मुळे, सुरेश महाजन, अवधूतराव विद्या, आश्विनी आपेट इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संकल्प करावा. असेही आवाहन बामणीच्या सरपंच सौ. प्रभावती राजकुमार बिराजदार यांनी व त्यांच्या सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
उदगीर तालुक्यातील एक नाविन्यपूर्ण प्रकल्प बामणी ग्रामपंचायत यांनी हाती घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
