राजेंद्र केंद्रे यांची संघटन कुशल क्षमता भाजपची ताकद वाढवेल – बाळासाहेब पाटोदे

राजेंद्र केंद्रे यांची संघटन कुशल क्षमता भाजपची ताकद वाढवेल - बाळासाहेब पाटोदे

उदगीर (एल.पी. उगिले) : प्रा. राजेंद्र केंद्रे हे एक संघटन कुशल आणि जनमानसामध्ये आपली वेगळी प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त असलेले व्यक्तिमत्व आहे. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी त्यांचा संपर्क आलेला आहे. विविध संस्था आणि विद्यार्थी यांच्याशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या या संपर्काचा आणि संघटन कुशलतेचा भारतीय जनता पक्षाला निश्चितच फायदा होईल. अशी अपेक्षा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केली.

ते प्रा. राजेंद्र केंद्रे यांची भारतीय जनता पक्षाच्या जळकोट तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा मोर्चाच्या वतीने सत्कार व स्वागत समारंभात बोलत होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, प्रा सतीश उस्तुरे, सत्यवान बोरोळकर, अंकुश राठोड, मंगेश येरकुंडे, मुन्ना बिरादार, भाजपाचे जेष्ठ नेते बाबुराव बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब पाटोदे यांनी स्पष्ट केले की, जळकोट तालुक्यात पूर्वी भारतीय जनता पक्षाची चांगलीच ताकद होती. ते गत वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रा. राजेंद्र केंद्रे प्रयत्न करतील, असा आपल्याला विश्वास आहे. तशी केंद्रे यांची क्षमता फार मोठी आहे. ते निश्चितपणे जळकोट तालुक्यात भाजपची ताकद वाढवून, येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाचे नेते तथा माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपला पहिल्या क्रमांकावर आणून ठेवतील. असाही विश्वास या प्रसंगी बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय जनता पक्षाचे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे यांनी राजेंद्र केंद्रे यांना या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. पूर्ण ताकतीने काम करून भाजपची ध्येय धोरणे घराघरापर्यंत पोहोचवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक बूथ निहाय कार्यकर्त्यांची यादी निर्माण करणे, आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करून त्यांना जनमानसात मिसळून कामाला लावणे गरजेचे आहे असेही सांगितले.

About The Author

error: Content is protected !!