निराधार माणसाला आधार देण्याचे कार्य करावे – दिलीपराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अनुदान योजना हि आधार नसलेल्या लोकासाठी असून ग्रामीण भागातील, गोरगरीब जनतेसाठी आहे. या माध्यमातून राजकारण बाजुला सारुन सर्वसमावेशक गोरगरीब जनतेसाठी नूतन संजय गांधी निराधार योजना समिती च्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्य करावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे
ते मंगळवारी लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना कमेटी च्या नूतन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल प्रवीण पाटील व सर्व सदस्यां च्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा शाल श्रीफळ व गांधीजींच्या विचाराचे प्रतीक चरखा देवुन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी नूतन सदस्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरीराम कुलकर्णी, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, सुरेश चव्हाण, सचिन दाताळ, नवनिर्वाचीत लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समिती चे चेअरमन प्रवीण पाटील, अशासकीय सदस्य अमोल देडे (गोंदेगाव), शितल राजकुमार सोनवणे (चिंचोली ( ब), धनंजय वैद्य (जेवळी), हरीश बोलंगे (भातांगली), अमोल भिसे (गादवड), संजय चव्हाण (कानडी बोरगाव), परमेश्र्वर पवार (नागझरी), रमेश पाटील (पेठ), आकाश कणसे (मुरुड) उपस्थित होते.