भिम आर्मीच्या महाराष्ट्र संघटक पदी लातूरच्या अक्षय धावरे ची दुसऱ्यांदा निवड

भिम आर्मीच्या महाराष्ट्र संघटक पदी लातूरच्या अक्षय धावरे ची दुसऱ्यांदा निवड

लातुर (प्रतिनिधी) : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय व महाराष्ट्र राज्य कोर कमिटीच्या वतीने आयोजीत केलेल्या महत्वाच्या मिटिंग मध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघटक पदी लातुर च्या अक्षय धावरे ची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतनसिंग यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय कार्यकारणी सद्स्य तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दत्तूजी मेंढे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी गुजरात प्रभारी अशोक भाऊ कांबळे, कोर कमिटी प्रमुख राजुजी झनके, वरिष्ठ उपाध्यक्ष रणधीर आल्हाट, रमेश बालेश, बलराज भाई दाभाडे, सुनील थोरात सचिव बाळूभाऊ वाघमारे, मुख्य संघटक दीपक भालेराव, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, मनीष साठे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख जावेद नायकवडी, वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर जी कांबळे तसेच मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे, मराठवाडा संघटक मिलिंद ढगे, लातुर जिल्हा प्रमुख विलास आण्णाचक्रे, जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे, लातुर शहर अध्यक्ष बाबा ढगे, बबलू शिंदे, बबलू गवळे, शिवा लांडगे, सुभाष बांसोडे, रोहित आदमाने आदी भिम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी अक्षयजी धावरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!