मराठवाडा युवक कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागीय समन्वयक पदी – विवेक कोकणे

मराठवाडा युवक कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागीय समन्वयक पदी - विवेक कोकणे

कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : येथील ग्रामपंचायत सदस्य तथा औसा विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विवेकजी कोकणेसर यांची मराठवाडा युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागिय समन्वयक पदी निवड झाली आहे. यामुळे कोकणेसरांवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विवेक कोकणेसर हे अनेक वर्षापासून राजनीतीसी प्रेरित आहेत व तसेच औसा मतदार संघाचे माजी आमदार बसवराज पाटीलसाहेब यांचे खास विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. यामध्ये कासार सिरसी ग्रामपंचायतला त्याने जनतेतून सतत दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गावामध्ये राजकारण, समाजकारण ते गावातील व शहरातील नागरिकांचे, जनसामान्यांमध्ये मिसळून, अडीअडचणीचे कामे करून, जनतेच्या मनात घर करत एक उभारता नेतृत्व स्वतःला साबित करून दाखवित आहेत. अनेकदा पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदारी दिली होती तो व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर आता त्यांना आणखीण एक मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जात आहे. वरील पद निवडीची पत्र नुकतेच भारतीय युवक काँग्रेसचे सोशल मीडिया आसाम व महाराष्ट्र प्रभारी डॉ, सुमित तांबे व महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी दिली आहे. या निवडीचे माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बसवराज पाटीलसाहेब,जनता बॅंकेचे अध्यक्ष विठ्ठल साई कारखानेचे चेअरमन बापुरावजी पाटील, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, कासार सिरसी गावचे सरपंच सौ. पांचाळताई, उपसरपंच बडेसाब लकडहरे, निलेश चिंचनसुरे,वीरेश चिंचनसुरे, सुरेश बरकंबे, ज्ञानेश्वर मडोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व मित्र मंडळी कडून सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

About The Author

error: Content is protected !!