प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तेलंगणातील आमदार टी. राजा सिंग यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविरुद्ध केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणी येथील युनायटेड मुस्लिम फोरमच्या वतीने शुक्रवारी (दि. २६) उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रपती यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साऱ्या जगाला शांती, समता, बंधुत्वाचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना जगातील आहेत. मुस्लिम समाजात सन्माननीय व मानवतेचे प्रतीक मानतात. त्यांच्या बाबत तेलंगणा येथील आमदार
टी. राजासिंग यांनी प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांना उद्देशुन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या
संविधानिक पदाचा दुरुपयोग करून देशातील शांतता, एकता व अखंडता भंग करण्याचा
प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कोणत्याही धर्माच्या किंवा महापुरुषांचा अपमान करण्यात येणार नाही असा कायदा करण्यात यावा, धर्मांध प्रतिबंध कायदा लागू करण्यात यावा, महाराष्ट्र विधानसभेत चर्चेसाठी प्रलंबित असलेल्या मोहम्मद पैगंबर बील लागु करावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती यांना उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी अॅड. जमीर जहागीरदार, अहमद सरवर, मोहम्मद मुन्तजी, समीर शेख, मंजूर पठाण, सनाउल्ला खान, अझरोद्दीन शेख, राजकुमार माने, दिलीप कांबळे, प्रदीप जोंधळे, बाबासाहेब देशमुख, फैयाज डांगे, शमशोदिन जरगर, इरफान शेख, हाश्मी सय्यद वशी अहेमद, मौलाना झाकीर शेख इमरान, शेख अझर, खान खाजा, मौलाना फारूख, मौलाना युसुफ, मौलाना मोयोदिन ,हाशमी सय्यद, इमरोज हाशमी, अब्दुल समद बागवान, शेख समीर, मुकरम जागीरदार आदी उपस्थित होते.
