श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र लोणी तर्फे सभापती पाटील यांचा सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र औद्योगिक वसाहत एम.आय.डी.सी लोणी तालुका उदगीर जिल्हा लातूर श्री. स्वामी समर्थ मुख्य दरबार संचलित… रघुकुल मंगल कार्यालय समोरील श्री. स्वामी समर्थ साप्ताहिक आरती केंद्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील यांच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांची सपत्नीक आरती संपन्न झाली. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लोणी येथील मुख्य दरबार बांधकामासाठी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देऊन सपत्नीक समर्थ सेवेकरी तथा तालुका कृषी अधिकारी अहमदपूर कार्यालयाचे सहाय्यक तंत्रज्ञ व्यवस्थापक पुरी विजयकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मीना तेलंग, शैला बिरादार, रेखा पुरी, निवृत्ती जवळे, मनीषा कलमे, ज्योती देशमुख, सरोजा पिचारे,अनुसया बिरादार, पूजा सूर्यवंशी, पल्लवी हजारे, सुप्रिया हजारे यांच्यासह अनेक समर्थ सेवेकरी भावीक – भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
