सौराष्ट्र अर्बन निधी लिमिटेड या बँकेस माजी गृहराज्य मंत्री आ.संजयभाऊ बनसोडे यांची सदिच्छा भेट
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सौराष्ट्र अर्बन निधी लिमिटेड बँकेला महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री आमदार संजयभाऊ बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजीराव मूळे उपस्थित होते.
याप्रसंगी बँकेच्या वतीने या बँकेचे मार्गदर्शक तथा महात्मा गांधी बँकेचे अध्यक्ष चेतनभैय्या वैजापुरे, डायरेक्टर प्रा.सिध्देश्वर पटणे, डायरेक्टर ऍड.तात्या पाटील, डायरेक्टर नितीश हरकरे,डायरेक्टर विश्वनाथ बिरादार, मॅनेजर जोशी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. बनसोडे साहेबांनी प्रातिनिधिक स्वरूपात बँकेचे डायरेक्टर प्रा.सिद्धेश्वर पटणे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना संजयभाऊ बनसोडे म्हणाले की, सहकार महर्षी चंदरआण्णा वैजापुरे व युवा उद्योजक चेतनभैय्या वैजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 4-5 तरुणांनी एकत्र येऊन इतर तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी व इतर चांगल्या कार्यासाठी आर्थिक सहकार्य करणार आहेत. हे कार्य अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. असे गौरवोद्गार काढून सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले व बँकेच्या भावी यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
