मातृभूमीने दिले विद्यार्थ्यांना वृक्ष दान-दत्तक
उदगीर : मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांना वृक्ष दान-दत्तक देत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे मोठे कार्य सुरु आहे.
मातृभूमी महाविद्यालय मागील आनेक वर्षापासुन पर्यावरणाचे संवर्धन व श्रमदानाचे तसेच पर्यावरण विषयक जाणीव-जागृतीचे काम करते . विद्यार्थ्यामध्ये पर्यावरण संवर्धना बरोबरच जानिव जागृतीसाठी अशा विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे ,प्राचार्या उषा कुलकर्णी , कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड, यांच्या हस्ते स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५ वृक्ष विद्यार्थ्यांना दत्तक देत वृक्ष वृक्षसंवर्धनाची शपथ दिली .
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दत्तक दिलेल्या वृक्षाचे आपल्या शेतात व व घरी उपलब्ध असलेल्या जागेत वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करणार आहेत. महाविद्यालयात शिक्षण चालू असे पर्यंत वृक्षा विषयीची महिती विद्यार्थी महाविद्यालस देणार आहेत. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वंयसेवक , विद्यार्थी उपस्थित होते .
