साई ग्रुपच्या वतीने नवनियुक्त तंटामुक्ती समितीचा सत्कार

साई ग्रुपच्या वतीने नवनियुक्त तंटामुक्ती समितीचा सत्कार

अतनूर (प्रतिनिधी) : येथील नवतरूण युवक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक यांचा सामाजिक आपतीत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी धावून जात असलेल्या साई ग्रुपच्या माध्यमातून अतनूर येथील नवनियुक्त तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विकास गोविंदराव सोमुसे-पाटील, उपाध्यक्ष अरविंद माधवराव सासट्टे, तंटामुक्ती सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे, सदस्य राहुल गायकवाड, माजी अध्यक्ष ईस्माईलसाब मुंजेवार, शफियोद्दीन मुंजेवार यांच्यासह सर्वाचा भव्य असा सत्कार शुक्रवार रोजी साई ग्रुपचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी साई ग्रुप चे अध्यक्ष विजय पाटील-गव्हाणे, साहेबराव पाटील-गव्हाणे, रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया आठवले गटाचे जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांंबळे, माजी सरपंच रमेश बोडेवार, चिंचोलीचे उपसरपंच राजेंद्र बंडरे, ग्राम विकास अधिकारी मैफुज मनियार, अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गायकवाड, राहुल गायकवाड, शिवाजी भांगे, सुधाकर कापडे, राम पाटील, सोसायटीचे संचालक मारुती गुंडीले, फय्याज मुंजेवार, माजी सरपंच गंगाधर वाघमारे, माधव शेटकार नळगीरकर, जलील आतार, अल्लाबक्श शेख, भास्कर पाटील, संजय कुलकर्णी, परमेश्वर कोंडामंगले, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कापडे, पप्पू सोमुसे, विश्वनाथ कोकणे, संजय येवरे, गोविंद कोकणे, नीतीन सोमुसे, राजेसाहेब मुंजेवार, प्रदीप कोकणे, मुकेश बोडेवार, राजू बिचकुंदे, मनोहर मुगदळे, शिराज खंडगावे, पमा वर्ताळे, नरेश कदम, तानाजी सोमुसे, गुंडू बोडेवार, पप्पू सासट्टे, रवी कल्पे, गोविंद बारसुळे, ईस्माईल मुंजेवार, बाजीराव कापडे, गंगाराम गायकवाड उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!