स्वच्छता कर्मचार्‍यांच्या हस्ते शंकरपुरम नगरच्या रस्ता व नालीच्या कामाचेे भूमिपुजन

स्वच्छता कर्मचार्‍यांच्या हस्ते शंकरपुरम नगरच्या रस्ता व नालीच्या कामाचेे भूमिपुजन

लातूर (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्र.18 मधील शंकरपूरम नगर भागातील रस्ता व नालीच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम मनपाच्या स्वच्छता कर्मचार्‍यांच्याहस्ते करण्यात आला. नेहमी शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्यार्‍या कर्मचार्‍यांच्या हस्ते उद्धाटन करण्याचा उपक्रम नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून राबविल्यामुळे त्यांच्या या विधायक उपक्रमाचे लातूर शहर व परिसरातून कौतुक होत आहे.

यावेळी या रस्ता व नालीच्या भूमिपुजन कार्यक्रमाला नगरसेवक बालाजी शेळके, भाग्यश्रीताई शेळके, सरिताताई राजगिरे, एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक अमरदिप जाधव, कमलाकर कदम, स्वच्छता निरिक्षक आक्रम शेख,मुकदम फेरोज शेख,अर्जुन गायकवाड, विनोद साबदे,सुपरवाझर संदिप कांबळे ,बबलु शिंदे, अक्षय ढावारे, बबलु गवडे, आदमाने ताई,शरणप्पा अंबुलगे,मुदगडे,बिराजदार, प्रभाताई अंबुलगे,पिटेवाड, परिहार,गंगाधर मोरे,भाग्यश्रीताई बंडे, उषाताई मुदगडे,सोमनाथ सोमवंशी,सूर्यकांत सूर्यवंशी,संतोष पोद्दार, नाना जाधव, बिडवे, भागवत झरकर,नागनाथ विभूते, आत्माराम पवार,नागनाथ,सुडे रमेश, गोविंद चौगुले,अशोक साबदे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा युवा नेते तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी राबविलेल्या या विधायक उपक्रमाचे लातूर शहर व परिसरातून कौतुक होत आहे.

About The Author