डॉ. सदाविजय आर्य यांचे ग्रंथ औदार्य दयानंद कला महाविद्यालयास 1121 ग्रंथांची भेट

डॉ. सदाविजय आर्य यांचे ग्रंथ औदार्य दयानंद कला महाविद्यालयास 1121 ग्रंथांची भेट

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रथम विभाग प्रमुख डॉ. सदाविजय आर्य यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत दयानंद कला महाविद्यालयास सुमारे 1121 ग्रंथ आणि 30 मासिके भेट म्हणून दिले.

डॉ.सदाविजय आर्य हे हिंदी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण नाव असून ते 1961 ते 1964 पर्यंत दयानंद कला महाविद्यालयात हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. नंतर ते औराद शहाजनी येथे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. नंतर प्राचार्य झाले. एक कुशल प्रशासक, कुशल संघटक व यशस्वी संस्था चालक म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. महाराष्ट्रातील एकमेव रमामाता आंबेडकर अध्यापक विद्यालय शहाजनी औराद, आंतरभारती मासीकाचे संपादक म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. तसेच बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो पदयात्रेत’ सक्रिय सहभाग त्यांचा होता. आंतरजातीय विवाह प्रक्रियेतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

डॉ. सदाविजय आर्य यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाच्या साहित्यकृती आणि संदर्भ ग्रंथ अत्यंत दुर्मीळ स्वरूपाचे आहेत. या ग्रंथांचे मुल्य सुमारे चार लाख असून ग्रंथांचे मूल्य अमूल्य आहे. डॉ. सदाविजय आर्य यांनी दाखविलेल्या औदार्याबद्दल संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले. सदर ग्रंथ संकलनांसाठी औराद शहाजनी येथे ग्रंथालयातील प्रशासकीय कर्मचारी श्री. श्रीकांत जोशी, श्री. दिलीप गिरबने व सुर्यवंशी तुकाराम यांनी ग्रंथ संकलन करून ग्रंथालयाकडे जमा केले आहेत.

About The Author