पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ४० झाडांचे रोपण

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ४० झाडांचे रोपण

प्रत्येक झाडाला शहीद जवानांच्या नावाची पाटी – ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिसरात वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन यामध्ये अग्रेसर असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष टीमने कार्याचा ६२७ वा अविरत दिवस साजरा करत, लातूर शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या स्मरणार्थ ४० मोठी झाडे लावून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करत प्रत्येक झाडाला शहीद जवानांच्या नावांच्या पाट्या लावण्यात आल्या.

यावेळी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परीमंडळ डॉ. एकनाथ माले, सायबर क्राईमचे आवेज काझी, उद्योजक विशाल राठी, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, महानगर पालीका नगरसेवक इम्रानजी सय्यद उपस्थित होते. अत्यंत आगळावेगळा उपक्रम राबविल्याबद्दल एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीम सद्स्यांचे कौतुक केले. कोरोना काळात जगण्याकरीता ऑक्सीजन विकत घ्यावे लागत होते, त्यामुळे ज्यांना कोरोना झाला होता त्यासर्वांनी आपल्या परीसरात झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परीमंडळ डॉ. एकनाथ माले यांनी केले.

हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी गंगाधर पवार, कल्पना फरकांडे, ॲड. वैशाली यादव-लोंढे, बाळासाहेब बावणे, बळीराम दगडे, रुषीकेश दरेकर, शिवशंकर सुफलकर, सिताराम कंजे, महेश गेलडा, जफर शेख, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, श्रुती लोंढे, सुरज पाटील, महेश भोकरे, विजयकुमार कठारे, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठान, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, प्रमोद वरपे, दयाराम सुडे, खाजाखॉ पठान, पठाण, बालाजी उमरदंड, अभिजीत चिल्लरगे, डॉ. अमृत पत्की, प्रसाद शिंदे, नितीन पांचाळ, अरविंद फड, तौसीफ सय्यद इत्यादी सर्वांनी वृक्ष लागवडीकरीता खड्डे खोदणे, झाडे आणणे, काळी माती आणणे, झाडे लावणे, पाणी देणे याकरीता श्रमदान केले.

About The Author