रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत रि.पा.ई. जिल्हा अध्यक्षपदी जेष्ठ नेते बाबासाहेब कांबळे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट च्या जिल्हाअध्यक्ष पदांची निवड करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि सर्व जेष्ठ नेते यांच्या उपस्थितीत दिनांक 29/08/ 2022 रोजी सोमवार दुपारी1:30 वाजता लातुर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात सर्वांच्या सहमतीने आणि सर्वानुमते एकमताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाबासाहेब कांबळे अहमदपूर यांची निवड करण्यात आली असून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून, पेढे वाटून आणि पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.या बैठकीचे अध्यक्ष चंद्रकांत चिकटे, प्रमुख उपस्थिती देविदास कांबळे, अशोक कांबळे, डॉ.सुधाकर गुळवे,भागवत गायकवाड,पुरोषत्तम सोनवणे, एस.के.चेलै, अँड. रवि केन्धे, जितेंद्र बनसोडे, लक्ष्मण तिकठे, अँड. प्रफुलकुमार कांबळे, सुशिल शिंदे, कांबळे पेंटर,मिलिंद महालिंगे,सोनुभैया कांबळे, विलास राठौड, पप्पु सरवदे, सुनिल वाहुळे, बालाजी कांबळे, धनराज सरकाळे, अहमदपुर ता.अध्यक्ष-अरुण भाऊसाहेब वाघंबर, जळकोट ता.अध्यक्ष विनोद कांबळे, चाकुर ता.अध्यक्ष पपण कांबळे, देवणी ता.अध्यक्ष गणेश कांबळे, रेणापुर ता.अध्यक्ष दयानंद घोडके, आणि लातूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेते, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, इतर अनेक असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानुन हि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपली.