अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय अहमदपूर यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबविण्यात आली. या मोहिमेस महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन लसीकरण मोहीम यशस्वी केली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लस व बुस्टर डोस शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस व बूस्टर डोस घेऊन ही मोहीम यशस्वी केली. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका श्रीमती आर.एन डावगोरे व एम.पी .कारले यांनी सहकार्य केले.

यावेळी क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ.मारोती कसाब, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. डी. एन. माने, डॉ. सचिन गर्जे, प्रा. अतिश आकडे, डॉ. पी. पी. चौकटे, डॉ. संतोष पाटील, प्रा. डी. जे. चव्हाण, प्रा. पी.एम. गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author