महात्मा फुले महाविद्यालयात प्रा. डॉ. सुनीता शिंदे यांचा सत्कार

महात्मा फुले महाविद्यालयात प्रा. डॉ. सुनीता शिंदे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित अहमदपूरच्या महात्मा फुले कनिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी प्रा.डॉ. सुनीता शिंदे यांची निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सुनीता शिंदे ह्या महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय, अभ्यासू आणि शिस्तप्रिय प्राध्यापिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन किसान शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांची कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी निवड केली. याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी डॉ. सुनीता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रशांत बिरादार यांनी केले. यावेळी क्रीडा विभागाचे संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. पी.पी.चौकटे, प्रा. अतिश आकडे, डॉ.सचिन गर्जे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी, शिवाजी चोपडे आदिंची उपस्थिती होती.

About The Author